सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; चुलत भावासह दोन शालेल्या विद्यार्थ्यांना अटक

0
1035

इंदूर, दि. २७ (पीसीबी) – मध्य प्रदेशमधील इंदूर जिल्ह्यात एका सहा वर्षीय चिमुकलीवर अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवार (दि.२१ सप्टेंबर) घडली होती.

याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीच्या चुलत भावासह दोन शालेय विद्यार्थ्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमरोल पोलिस ठाणे क्षेत्रातील दतोदा गावात तीन मुलांनी शुक्रवारी सहा वर्षीय चिमुकलीवर तिच्या घराजवळच बलात्कार केला. त्यानंतर हा प्रकार कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशीही धमकी दिली. या धमकीमुळे घाबरलेली पीडित मुलीने काही दिवस कोणालाच याची माहिती दिली नाही. शाररिक वेदना असह्य झाल्यानंतर तिने आपल्या मोठ्या बहिणीला बुधवारी (दि.२६) याची सर्व माहिती दिली. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तातडीने सिमरोल पोलिस ठाण्यात तीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला. यामध्ये एका मुलाचे वय १२ तर उर्वरित दोघांचे वय हे १५-१५ वर्ष आहे. यातील एक आरोपी हा पीडित मुलीचा चुलत भाऊ आहे. मुलीला इंदूर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.