सर्वांसाठी २० लाख कोटींचे पॅकेज; पंतप्रधानांनी केली लॉकडाऊन फोर ची घोषणा

0
357

नवी दिल्ली , दि.१२ (पीसीबी) – कोरोनाच्या संकटावर मात करून भारत हा खऱ्या अर्थाने या संकटाचे संधी रुपांतर करेल आणि २१ वे शतक भारताचेच असेल, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद मोदी यांनी व्यक्त केला. आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी सर्व घटकांसाठी २० लाख कोटी रुपयांचे एक विशेष आर्थिक पॅकेज त्यांनी जाहिर केले. लॉकडाऊन फोर कसे असेल यांचा तपशील १८ मे पुर्वी जाहिर केला जाईल असे सांगत त्यांनी चैथ्या टप्प्यातील टाळेबंदीही जाहीर केली. देशातील शेतकरी, कामगार, उद्योजक, मजूर, मध्यमवर्ग या सर्वांसाठी हे पॅकेज असेल असेही त्यांनी स्पष्ट कले.

पंतप्रधान मोदी यांनी बरोबर रात्री आठ वाजता सुरू केलेले निवेदन ३५ मिनीटे सुरू होते. ते म्हणाले, २० लाख कोटींचे हे पॅकेज २०२० मध्ये देशाला नवीन गती देईल. या प्रकेज मध्ये लॅन्ड, लेबर, लिक्विडिटी आणि लॅ या सर्वांवर भर असेल. त्याचा लाभ गरिब, मजूर, कुटिरोद्याग, लघु, मध्यमव सुक्ष्म उद्योग तसेच मध्यमवर्गाला होईल. या पॅकोजमुळे गुंतवणूक आकर्षीत होईल, कार्यक्षमता वाढेल, दर्जा सुधारलेला दिसेल. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन् या पॅकेज बद्दल विस्ताराने सांगतील. गेल्या सहा वर्षात सरकराने ज्या काही सुधारणा केल्या त्यामुळे आज आपली व्यवस्था अधिक सक्षम झाली आहे. या मोठ्या संकटात मोठ्या मोठ्या व्यवस्था असलेले हादरले, पण त्यात एक गोष्ठ नमूद केली पाहिजे. आपली सर्व मागणी लोकल (स्थानिक) उत्पादकांनीच पूर्ण केली. आता आपली जबाबदारी आहे की, यापुढे हे लोकल ग्लोबल करायचे. २१ वे शतक हो भारताचे आहे असे फक्त म्हटले जात होते, आता ती संधी आली आहे.

मोदी म्हणाले, आज आम्ही एका नाजूक वळणावर उभे आहोत. कोरोनाच्या संकटातून आपल्याला मोठी संधी दिली आहे. पूर्वी पीपीई किट आपल्याकडे बनविले जात नव्हते, आता आपण रोज २ लाख पीपीई किट बनवितो. एन ९५ मास्कचे उत्पादन अगदीच किरकोळ होते, आता रोज २ लाख मास्क आपण निर्मिती करतो. संकटातून संधी कशी येते त्याचे हे उदाहरण भारताने दाखवून दिले. त्यामुळे अपेक्षा खूप वाढल्या आहेत. आज जगाला विश्वास आहे की या संकटातून भारतच खूप काही चांगले करू शकतो. भारताच्या प्रगतीत विश्वाची प्रगती सामावलेली आहे, असेही त्यांनी सांगितले.

निवेदनाच्या अखेरीस त्यांनी लॉकडाऊन चार ची घोषणा केली. ते नेमके कशा प्रकारचे असेल ते नंतर सविस्तरपणे सांगितले जाईल असेही ते म्हणाले. आपल्याला या संकटावर मात करून पुढे जायचे आहे, असे आणि मला खात्री आहे की आपण ते करून दाखविणार असे त्यांनी आपल्या भाषणात वारंवार सांगितले. यापुढे कोरोनाच्या बरोबरच आपण सगळे नियम पाळून पुढे जायचे आहे, या संकटापुढे झुकायचे नाही, असे दिलासादायक बोलताना कच्छच्या भूखंपात तो प्रदेश कसा उध्वस्त झाला होता आणि कालांतराने कसा नव्या दमाने उभा राहिला हे मोदी यांनी सांगतिले.