सरकारने मराठा आरक्षणावर वेड्याचं सोंग घेतलं आहे – विनायक मेटे

0
363

पुणे,दि.२५(पीसीबी) – सरकारने मराठा आरक्षणावर वेड्याचं सोंग घेतलं आहे असं म्हणत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर टिका केली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

“मराठा समाजावर शिक्षण आणि नोकरीमध्ये अन्याय होतोय. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर राज्य सरकारने जी पावलं उचलायला पाहिजे होती ती उचलली नाहीत. त्याबद्दल समाजात रोष आहे. त्यामुळेच आंदोलने होताहेत”, असा दावा विनायक मेटे यांनी केला. त्याचबरोबर “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जोपर्यत ‘मातोश्री’च्या बाहेर पडत नाही, तोपर्यंत त्यांना महाराष्ट्रातील जनतेचं समाजमन कळणार नाही” असंही विनायक मेटे यावेळी म्हणाले.

दरम्यान “सरकारने विविध प्रकल्पांसाठी निधीची घोषणा केली. त्याचं आम्ही स्वागत करतो. केंद्र सरकारच्या EWS चा लाभ आरक्षणाशिवाय देता येणार नाही. राज्य सरकारने यासंदर्भात आधी काढलेले परिपत्रक रद्द केल्याशिवाय EWS चा लाभ देता येणार नाही. त्याचबरोबर आता आरक्षणाला स्थगिती आल्यानंतर पोलीस भरतीचे काय करणार?”, असा सवाल मेटे यांनी केला.