‘सरकारच्या अशा वागणुकीमुळे विकृत गुन्हेगारांना वाव मिळतोय’; पुण्यातील १४ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचारप्रकरणी चित्रा वाघ संतप्त

0
240

– ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे 

पुणे, दि.०८ (पीसीबी) : रविवारी ५ तारखेला पुण्यातील वानवडी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेमुळे पुणे शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. आरोपींनी पीडित मुलीचे रिक्षातून अपहरण केले. पीडित मुलीला वानवडी परिसरात नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी ७ आरोपींना बेड्या ठोकल्या. आणि त्यानंतर पकडलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरून उर्वरित आरोपींच्या देखील पुणे पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दरम्यान आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांची या प्रकरणी भेट घेत चर्चा केली असता त्यांनी या प्रकरणी संताप व्यक्त करत स्त्री संरक्षणाचा मुद्द्यावरती भाष्य केलं.

चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांची भेट घेतली आणि पुण्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या कि, ‘पुण्यातील १४ वर्षीय मुलीसोबत घडलेली हि सामूहिक बलात्काराची घटना अशी आहे ज्यामुळे मान शरमेने खाली जाईल. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आणि पुणे पोलिसांनी तब्बल १४ आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे. या १४ आरोपीपैकी १२ आरोपी विवाहित असून त्यांना मूल आहेत. त्यांचे संसार आहेत. तरी देखील लोक इतके विकृत कसे असू शकतात. शहरात अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. स्त्री संरक्षणाच्या कायदे कडक करायला हवे. प्रत्येक सरकारच्या काळात मुलींवर अत्याचार होतात. उद्या भाजप सरकार आल्यानंतर हे सगळं लगेच बंद होईल असा मी दावा करत नाही. पण ते ते सरकार त्या त्या वेळी भूमिका काय घेत हे महत्वाचं असत. पण दुर्दैवाने या सरकारमध्ये तेच मेहबुब शेखच प्रकरण, तेच संजय राठोडची केस ज्या मध्ये अजूनही FIR दाखल नाही आणि अशी आणखी हि काही प्रकरणे आहे ज्यामध्ये FIR न होणं, संशयास्पद भूमिका निर्माण होणं, आणि त्यामुळे सरकारच्या या वागणुकीमुळे कुठे तरी गुन्हेगारांना वाव मिळतोय कि काय?? असं वाटतंय. काही दिवसांपूर्वी राज्यातील मंत्र्यांवर बलात्काराचे आरोप केले गेले, तर हे सरकार नक्की अभय कोणाला देणार आहे, याबाबतची भूमिका संशयास्पद आहे. दरम्यान, या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी विविध धर्माचे आहेत तर त्यावर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत म्हंटल कि, ‘कोणत्याही आरोपीला जात नसते, कुठला धर्म नसतो, जगातला कोणताही धर्म असं शिकवत नाही कि तुम्ही स्त्रियांवर, लहान लेकरांवर अत्याचार करा, इतक्या वाईट पद्धतीने वागा. आरोपी हा आरोपीचं असतो. त्याला कडक शिक्षा देणं गरजेचं आहे.’

पुढे चित्रा वाघ या असंही म्हणाल्या कि, ‘मुली आणि स्त्रियांच्या रक्षणासाठी निर्भया स्कॉड, दामिनी स्कॉड आहेत. हे स्कॉड ज्या ज्या ठिकाणी आहेत तेथे वाढवणं गरजेचं असून. फक्त मेट्रो सिटी मधेच नाही तर ग्रामीण पातळीवर सुद्धा याची गरज आहे. स्त्री सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे.