सरकारचे कामगारांबाबतचे धोरण अयोग्य – शरद पवार

0
982

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – सरकारचे कामगारांबाबतचे धोरण योग्य नसून, देशातील कारखानदारी दिवसेंदिवस अडचणीत यायला लागली आहे, अशी खंत राष्ट्रवादीची अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (दि. ३) व्यक्त केली.

कै. भिकू वाघेरे प्रतिष्ठानच्या वतीने रहाटणीत आयोजित कामगार परिषदेत ते बोलते होते. या परिषदेचे उद्घाटन किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ कुचिक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी आमदार अजित पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, अजित अभ्यंकर आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, “कामगारांना किमान वेतनावर घेतले नाही. त्यामुळे त्यांच्यात संतापाचे वातावरण आहे. कामगारांचे प्रश्न जटिल बनले आहेत. कंत्राटी कामगारांना संरक्षण दिले पाहिजे. भाजप सरकारच्या नोटाबंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. आजच्या सरकारने कामगारांबाबतचे धोरण उदासिन आहे. कामगारांचे प्रश्न न सुटल्यास कामगारांची शक्ती एकत्र आल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. रघुनाथ कुचिक, आमदार अजित पवार, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, अजित अभ्यंकर, कैलास कदम यांनी मनोगत व्यक्त केले.