सततच्या त्रासाला कंटाळून पत्नीने पतीला शॉक देऊन केला खून

0
653

नांदेड, दि. १६ (पीसीबी) – चारित्र्यावर संशय घेऊन सतत त्रास देणाऱ्या पतीचा पत्नीने विजेचा शॉक देऊन खून केला. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि.१५) रात्री साडेबाराच्या सुमारास तळेगाव ता. उमरी येथे घडली.

भीमराव नागोराव हैबते (वय ४२) असे मयत पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री मयत भीमराव यांनी चारित्र्याच्या संशयवरुन पत्नी आम्रपालीसोबत भांडण केले. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. यामुळे चिडलेल्या आम्रपालीने घराबाहेरील पत्र्याच्या शेडमधील करंट वाहत असलेली वायर काढली. आणि भीमराव यांना शॉक दिला.  यामुळे भीमराव यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर सकाळी ही माहिती लपविण्यासाठी आम्रपालीने बनवाबनवी करून पोलिसांना चुकीची माहिती दिली. मात्र मयत भीमरावची बहीण जयशीला चव्हाण हिला घटनेबाबत संशय आल्याने तिने आज सकाळी उमरी पोलिसात तक्रार केली. आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला.  त्यावरून ही घटना उघडकीस आली.  पतीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून आम्रपाली  हिच्याविरुद्ध उमरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला व अटक केली आहे.