संस्कार भारती पिंपरी चिंचवड बाल विधेने आयोजित केलेल्या कलाध्यायी स्पर्धेचा बक्षिस समारंभ देशभक्ती रसात संपन्न !

0
204

‘रंगगंध ‘ चे राष्ट्रपती पुरस्कार विजेते अध्यक्ष श्री. सुमित पाटील यांचे हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण

निगडी, दि. १४ (पीसीबी) – स्वा. सावरकर सदन निगडी प्राधिकरण येथे संस्कार भारती पिंपरी चिंचवड समितीच्या बाल विधेच्या माध्यमातून नाट्य – नृत्य – संगीत – चित्रकला या विभागांना सामावून देशभक्ती या विषयावर ऑनलाइन पद्धतीने हि स्पर्धा घेण्यात आली होती, या स्पर्धेला भरघोस असा प्रतीसाद लाभला. स्पर्धकांमध्ये पुणे जिल्हा आणि इतर जिल्ह्यातील स्पर्धक देखील सामील झाले होते.

बाल विधा प्रमुख सौ. सायली काणे यांनी उपस्थितांचे स्वागत केल्यांनतर श्री. सुमित पाटील, पश्चिम प्रांताच्या प्राचीन कला आणि ऐतिहासिक वास्तू विधेच्या सहसंयोजिका व प्रतिथयश लेखिका सौ. विनिता ताई देशपांडे, प्रांताच्या साहित्य विधा संयोजिका सौ. विशाखा कुलकर्णी,समितीचे अध्यक्ष श्री. सचिन काळभोर, सचिव मा. लीना ताई आढाव यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन, भारतमाता आणि नटराज प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यांनतर संगीत विधा सहप्रमुख सौ. शर्मिला शिंदे यांनी संस्कार भारती ध्येय गीत सादर केले. श्री. सचिन काळभोर यांनी प्रास्ताविक केले.

दिव्यांग मुलांसाठी श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून काम करणारे सुमित पाटील हे उत्कृष्ट चित्रकार असून अंध मुलांना सफाईदार पणे चित्र काढण्यासाठी ते शिकवत असतात, यावेळी मनोगतात ते म्हणाले मुलामंध्ये लपलेली प्रतिभा हि चित्रांद्वारे बाहेर येते, त्यांना मोकळॆपणानं चित्र काढू द्या त्यांना बहरू द्या.. डोळस लोकांना चित्रातील दृष्टी देण्यासोबत दिव्यांग मुलांकडून चित्र काढून घेणे खूप रोमांचकारी अनुभव असतो.

यावेळी बक्षिस वितरणापूर्वी संगीत विधेमध्ये कार्यरत असणाऱ्या आणि संजीवनी महिला शाहीरी पथकाने उत्तम सादरीकरण केले, या सादरीकरणाने उपस्थितांमध्ये देशभक्तीचे स्फुरण जागविले . यात भारत वंदे मातरम् जय भारत वंदे मातरम्,सावरकर लिखित पोवाडा जयोस्तुते श्री महनमंगले शिवास्पदे शुभते,हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषिंतांचे ,भारत के जवांनो भारत के जवांनो,माझा भारत बलशाली भारत अशी स्फूर्ती दायी गीतांचा समावेश होता.

प्रत्येक विभागात 8 ते 10 वर्षे व 11 ते 14 वर्षे या दोन गटात हि स्पर्धा घेण्यात आली, जोरदार प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेचे विजेते खालील प्रमाणे – 

चित्रकला स्पर्धा –
श्रीकर प्रसाद कुलकर्णी (प्रथम क्रमांक),प्रयाग नरेश भाकरे (व्दितीय क्रमांक),स्विकृती सुभाष चव्हाण (तृतीय क्रमांक) ,आरोही मंदार देशपांडे (उत्तेजनार्थ),सोहम संजय फसाले ( उत्तेजनार्थ)
गट 2 -अमिता अतुल नेर्लीकर (प्रथम क्रमांक ),अर्ना शैलेश मालेगांवकर (व्दितीय क्रमांक),सृष्टी संदेश भोकरे (तृतीय क्रमांक),प्रियांजली नंदलाल गुप्ता (उत्तेजनार्थ),शिवम महादेव मोरे (उत्तेजनार्थ )
नृत्य स्पर्धा – छोटा गट तनिष्का नायर (प्रथम क्रमांक),वंशी जानी – (द्वितीय क्रमांक),इलिषा शिंदे – (तृतीय क्रमांक)
मोठा गट – आर्या आनंद बाळ (प्रथम क्रमांक),शांभवी पुराणिक (द्वितीय क्रमांक),अन्वी बेलसरे
(तृतीय क्रमांक)
संगीत स्पर्धा – छोटा गट मनवा देशपांडे (प्रथम क्रमांक),शरण्या देशमुख (द्वितीय क्रमांक )ऊर्जा गुमगावकर ( तृतीय),ईशान गद्रे (उत्तेजनार्थ ),श्रेया हेगडे (उत्तेजनार्थ)
मोठा गट पार्थ शर्मा (प्रथम क्रमांक ),श्वेता दाभाडे ( द्वितीय क्रमांक ),शर्वरी हरळ (तृतीय क्रमांक )
या सर्व विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी सोबत प्रशस्तिपत्रक देण्यात आले तसेच सहभागी स्पर्धकांनादेखील संस्कार भारती तर्फे प्रशस्तीपत्रक देण्यात आले

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सचिव सौ. लीना आढाव, बाल विधा प्रमुख सौ. सायली काणे, नाट्य विधेच्या कु. वैष्णवी गर्गे, संगीत विभागाच्या सौ. शर्मिला शिंदे, रागिणी कौसडीकर, श्री सारंग चिंचनिकर, चित्रकला विधेचे श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी साहित्य विधेच्या सौ. शुभदा ताई दामले, शोभा पवार देखील उपस्थित होत्या.

या स्पर्धेचे परीक्षण जेष्ठ रंगकर्मी श्री. किरणजी येवलेकर, नृत्य विधा प्रमुख सौ. वरदाताई वैशंपायन,पार्श्व गायक श्री. तुषार रिठे, सुनीता आचार्य यांनी काम पाहिले.

यावेळी परीक्षकांसह सर्व मान्यवरांना ” भीमबेटकाच्या शोधात ” या पुस्तकांची प्रत भेट स्वरूपात देण्यात आली.

विशेष म्हणजे उपस्थित पालकांपैकी बऱ्याच पालकांनी आपल्या स्वतःच्या सदस्य नोंदणीबरोबरच आपल्या पाल्याना संस्कार भारतीच्या बाल विधेत प्रवेश घेतला आणि सदस्य नोंदणी केली.

या वेळी समितीच्या सचिव सौ. लीना आढाव यांनी मान्यवर,सर्व पालक, बालचमू आणि मान्यवरांचे, समिती सदस्यांचे आभार मानले.