संयुक्त विद्यमाने उद्योगनगर परिसरात मतदार जनजागृती अभियान

0
34

संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर आणि कामगार कल्याण केंद्र उद्योगनगर व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योगनगर परिसरात मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले.यामध्ये परिसरातील नागरिकांनी मतदान करुन आपला हक्क बजवावा मतदान करावे असे आवाहन करण्यात आले.

मतदार राजा जागा हो,लोकशाहीचा धागा हो. आन बान शान से,सरकार बने,सरकार बने मतदान से.
नर असो की नारी करा मतदान सर्वांची आहे जबाबदारी.भारत देश आहे महान ,लोकशाहीला करा मतदान.लोकशाहीची एकच शान पवित्र कार्य मतादान.

अशा विविध घोषणा दिल्या.शेवटी प्रतिज्ञा घेण्यात आली.
संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री विठ्ठल जोशी,कामगार कल्याण केंद्र उद्योगनगर प्रमुख श्री प्रदिप बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली याचे संयोजन करण्यात आले होते .पिंपरी चिंचवड मनपाचे नोडल अधिकारी श्री राजाराम सरगर,श्री प्रिन्स सिंह,दिपक यानावर,श्री संजु भाट,आनंद पाथरे,राजेंद्र फडतरे,नम्रता बांदल,मनोहर कड,प्रिया पुजारी,रंजना जोशी,रमेश सरदेसाई,विजय आगम,मिनाक्षी मेरुकर,संध्या स्वामी,प्रदिप बांदल आणि ६० सभासद सहभागी झाले होते