संजय राऊतांसाठी नवाब मलिकांचे ट्विट ,धीरे धीरे प्यार को बढाना है… …….

0
808

मुंबई ,दि.११(पीसीबी) – महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या विभिन्न विचारधारेचे पक्ष राज्यात सत्तेत आले आहेत. मात्र महिनाभराच्या सत्तासंघर्षामध्ये शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक हे ट्विटरवरच्या माध्यमातून शेरो शायरी करताना दिसत आहेत.

अलीकडेच नवाब मलिक यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. हे ट्विट त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना टॅग केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, धीरे धीरे प्यार को बढ़ाना है, हद से गुजर जाने है. नवाब मलिकांच्या या ट्विटचा रोख शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यातील जवळीक आणखी वाढविण्यासाठी संकेत दिले असल्याची चर्चा आहे.

सध्या देशामध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन प्रचंड गदारोळ निर्माण झाला आहे .लोकसभेमध्ये हे विधेयक 311 मताने मंजूर झालं आहे. तरीही राज्यसभेत विधेयक पास करण्यासाठी सरकारची कसोटी पणाला लागणार आहे. मात्र या सगळ्यांमध्ये शिवसेनेची शिवसेनेची भूमिका अनिश्चित आहे . यामुळेच नवाब मलिकांनी हे ट्विट केलं असावं अशी चर्चा सुरु आहे.