शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता, त्यांना दोष देता येणार नाही..

0
287

पुणे, दि. २५ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील परिस्थितीवर भाष्य करत भाजपवर निशाणा साधला. काही लोक सत्ताा गेल्यामुळे अजून अस्वस्थ आहेत. निवडणुकीआधी त्यांनी मी येणार असं म्हटलं होतं. मात्र तसं न झाल्याने त्यांच्यात अस्वस्थता आहे. हल्ला झाल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या आज दिल्लीत भेटीगाठी घेत आहेत. केंद्राकडून राज्यात विशेष पथक पाठवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. राणांनी देखील हायकोर्टात अर्ज दाखल केलाय. यावर बोलताना, मुख्यमंत्र्यांचं एकेरी नाव घेऊन वेडंवाकडं बोलणं शोभत नाही, असं पवारांनी म्हटलं. घरात येऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं राणा म्हणाल्या. यामुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता असल्यास त्यांना दोष देता येणार नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी ८० च्या दशकातील त्यांचा एक किस्साही शेअऱ केला. तसेच बाळासाहेबांसोबतचे संबंध अधोरेखित केले.

रात्री साडेबाराला सत्ता गेली…सकाळी मी वानखेडेवर मॅच बघत बसलेलो’
माझी कैकदा सत्ता गेली. ८० साली माझं सरकार बरखास्त केलं. मला रात्री साडेबाराला राज्यपालांनी याची माहिती दिली. मी त्यानंतर लगेच घरातील सामान आवरून दुसऱ्या जागेत राहायला गेलो. सरकारी जागा सोडली. यानंतर सकाळी दहाला इंग्लंड आणि भारताच्या क्रिकेट सामन्यासाठी वानखेडेवर गेलो. आणि दिवसभर मॅच एन्जॉय केली. हल्ली काही लोक सत्ता गेल्यानंतर फार अस्वस्थ आहेत. मी त्यांना दोष देऊ शकत नाही. मी येणार अशा घोषणा त्यांनी दिल्या होत्या. पण तसं घडू शकलं नाही.