शिवसेनेला पुन्हा हादरा, आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेला मोठे भगदाड

0
365

पुणे, दि. २६ (पीसीबी) : युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, सचिव वरून सरदेसाई यांच्यावर बोट ठेवत युवासेनेच्या राज्यभरातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवासेनेला रामराम केला. राज्यातील बहुतांश जिल्ह्यातून आलेल्या या पदाधिकाऱ्यांनी गेल्या अडीच वर्षातील कारभार पक्ष संघटनेच्या हिताचा नव्हता. त्यामुळे यापुढच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्णय जाहीर केला.शिवसेनेत आणि युवासेनेत एका सचिवाच्या माध्यमातून सर्व आदेश निघत होते, असा आरोप वरून सरदेसाई यांचे नाव न घेता करण्यात आला. युवा सेना स्थापन झाली तेव्हा सुरवातीला मी एकटा आदित्य ठाकरे यांच्यासोबत हो. माझी हकालपट्टी  पूर्वेश ‘सामना’मध्ये बातमी देऊन करण्यात आली, असे पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले.

सचिव किरण साळी, सर्वेश सरनाईक, रूपेश पाटील, राज कुलकर्णी, श्रीराम राणे या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका आज स्पष्ट केली.या पुढच्या काळात महाराष्ट्रभर दौरा करून युवा सेनेची बांधणी अधिक जोमाने करण्याचा निर्धार यावेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी केला.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार तसेच धर्मवीर आंनद दिघे यांच्या शिकवणीला प्रमाण मानून पुढे चाललेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि त्याचसोबत युवासेना व युवतीसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संपूर्ण महाराष्ट्र भरातून प्रचंड संख्येने पाठिंबा मिळत असल्याचा दावा यावेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी केला.

ठाणे, सोलापूर, रायगड, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, कर्जत, धाराशिव, अकोला, संभाजीनगर, बारामती, मुंबई शहर, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ येथील युवासेनेच्या सहसचिव, जिल्हाधिकारी, विस्तारक आणि शहरप्रमुख यांसोबत सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज मुंबईत बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनी भूमिका स्पष्ट केली.

यामध्ये उत्तम आयकले (युवासेना विस्तारक), अमित देशमुख (शहरप्रमुख नाशिक ग्रामीण), धीरज कंडारे (येवला उपशहरप्रमुख), संतोष त्रिभुवन (विभाग प्रमुख, येवला), ऋषी जाधव (बुलढाणा युवासेना जिल्हाधिकारी), विठ्ठल सरप (अकोला जिल्हा युवसेनाधिकारी), चेतन पाटील (नवीमुंबई विभागाधिकारी), महेश कुलकर्णी (नवीमुंबई उपविधानसभा अधिकारी), दीपेश म्हात्रे ( कल्याण लोकसभा जिल्हा युवसेनाधिकारी), निखिल वाळेकर (युवासेना विस्तारक आणि माजी नगरसेवक), युवासेना विस्तारक किरण साळी, युवासेना विस्तारक राज कुलकर्णी, नेहा उतेकर (कळवा शहर युवती अधिकारी), सागर राजपूत (ठाणे शहर चिटणीस), चंद्रकांत साळवी (कळवा शहर समन्वयक), आशु सिंग (कल्याण उपजिल्हाधिकारी), नितीन झांजे (कर्जत उपतालुका अधिकारी).

स्वप्नील मते (कर्जत उपतालुका अधिकारी), अनिकेत भोईर (कर्जत तालुका समन्वयक), प्रभाकर भोसले (सहसचिव कर्जत), निखिल बुडजडे (ठाणे उपविधानसभा अधिकारी), मतीन काजी (सांगली जिल्हा समन्वयक), स्वाती पाटील (सांगली जिल्हा युवती अधिकारी), प्रियांका पवार (सांगली जिल्हा युवती अधिकारी), प्रियांका पाटील (माजी नगरसेविका, ठाणे आणि ठाणे उपजिल्हा युवती अधिकारी), क्षितिजा कांबळे (उपयुवती अधिकारी कोपरी पाचपाखाडी विधानसभा), अमर मिसाळ (कर्जत तालुका मा. सभापती आणि तालुका युवा अधिकारी), प्रसाद थोरवे (कर्जत उपतालुका अधिकारी), आकाश माने (सांगली जिल्हा युवाधिकारी), सचिन कांबळे (सांगली जिल्हा युवाधिकारी), राजप्रकाश सुर्वे (मुंबई युवासेना अधिकारी), प्रभुदास नाईक (भिवंडी ठाणे ग्रामीण जिल्हा युवाधिकारी), अभिषेख अरविंद मोरे (कल्याण उपजिल्हा युवाधिकारी), भूषण यशवंतराव (कल्याण उपजिल्हा युवाधिकारी), प्रतीक पेणकर (कल्याण विधानसभा समन्वयक), सूचक डामरे (कल्याण जिल्हा चिटणीस), रोहित डुमणे (कल्याण पूर्व शहर अधिकारी), तेजस देवकाते (कल्याण पूर्व उपशहर युवाधिकारी), राजेश महाडिक (कल्याण उपशहर युवाधिकारी), सचिन बांगर (पुणे विस्तारक), बापू शिंदे (शिरूर युवा जिल्हाधिकारी) यांसह अनेक युवासेना आणि युवतीसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित राहुन राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांना आपले समर्थन देत असल्याचे ठामपणे सांगितले.