शिवसेना खासदार रवींद्र गायकवाडांच्या तक्रारीवरून ओमराजे निंबाळकरांच्याविरोधात गुन्हा   

0
482

उस्मानाबाद, दि. १६ (पीसीबी) – आपली बदनामी केल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात  अब्रुनुकसानीची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार उमरगा पोलीस ठाण्यामध्ये ओमराजेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्याच्या  राजकारणात  खळबळ उडाली आहे.

ओमराजे निंबाळकर यांनी एक व्हिडीओ क्लिप काढून  सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यामुळे आपली बदनामी झाल्याचा आरोप रवींद्र गायकवाड यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. यामुळे आपली बदनामी झाली असून राजकीय प्रतिमाही मलीन झाली आहे, असे त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, यासंदर्भात  खासदार रवींद्र गायकवाड यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. यात ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.