शिवशाही व्यापारी संघाचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा

0
583

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – शिवशाही व्यापारी संघाने लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. शिष्टमंडळामध्ये संघटनेचे प्रदेश सचिव गणेश आहेर, प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील, माऊली जाधव, मारूत म्हस्के, बाळासाहेब गायकवाड, धाराशिव उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रशांत पोचापुरे, सातारा जिल्हाध्यक्ष रमेश दाखले, उल्हासनगर अध्यक्ष कृष्णा गायकवाड, मोहित सुलाखे, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख, बबलु वाणे, खालापूर तालुकाध्यक्ष छगन राठोड, कर्ज तालुकाध्यक्ष सुहास ठाकरे, नवी मुंबई बेलापूर विधानसभा अध्यक्ष मिथुन खोपडे, मुंबई अध्यक्ष योगेश घोरपडे, महिला आघाडी प्रदेश कार्याध्यक्षा सुनीता खंडाळकर, प्रदेश उपाध्यक्षा भाग्यश्री म्हस्के, पुणे शहर उपाध्यक्ष महादेवी जळकोटे, संगीता नाईक यांचा समावेश होता.