‘शिवशाही’च्या राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांशी ‘मोगलशाही’सारखी वागणूक का? : आम आदमी पार्टी

0
319

– पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारासमोर सुरू असलेल्या आंदोलनात आपचे कार्यकर्ते झाले सहभागी

पिंपरी, दि.१२ (पीसीबी) : एसटी राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करून घेण्याच्या मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला आम आदमी पार्टी चा पाठिंबा देण्यात आला आपचे पिंपरी चिंचवड कार्यध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी बोलतांना सांगितलं केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचा खाजगीकरणावर जोर आहे, आम आदमी पार्टीचा या खाजगीकरणाला कायम विरोध राहिलेला आहे एसटी महामंडळाचे महाराष्ट्र सरकार मध्ये विलणीकरण करण्यात यावे. आम आदमी पार्टी महाराष्ट्रभर आंदोलनाला पाठिंबा देत आहे, एसटी कर्मचाऱ्यांना हक्काचा पगार वेळेवर मिळत नाही, ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांना पगार नसल्याने कुटुंबियांसोबत दीपावली साजरी करण्यास आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असताना जवळपास ३५ हून अधिक कर्मचाऱ्यांनी आर्थिक परिस्थिती व नैराश्येच्या मानसिकतेतून आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या. मराठी माणूस जीव देत असताना एसटी कर्मचाऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार निष्क्रिय ठरले आहे. निष्क्रिय सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची ही प्रमुख मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी, आशी मागणी त्यांनी यावेळी केली.

तसेच हा प्रश्न लवकर न सुटल्यास एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने जनतेला सोबत घेऊन प्रत्येक चौका..चौकात महाराष्ट्र भर आवाज उठवणार असल्याचे आम आदमी चे कोअर कमिटी सदस्य वैजनाथ शिरसाट यांनी सांगितले.ते बोलतांना असे ही म्हणाले की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे व एसटी टोल ,डिझेल कर माफ करुन जनतेला माफक दरामध्ये एसटीने प्रवास करता येईल अशा योजना महाराष्ट्र सरकारने तयार करण्यात याव्यात, अन्यथा जनता आवाज उठवल्या शिवाय राहाणार नाही. अशी मागणी त्यांनी केली

त्याचप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करताना संघटितपणे संघर्ष करावा. कोणत्याच कर्मचाऱ्याने निराश होऊन टोकाचे पाऊल उचलू नये. आपल्या कुटुंबाला आपणच आधार आहोत याचे भान ठेवून आत्महत्या करण्याचा साधा विचार सुद्धा मनात आणू नये. जो काही न्याय मिळवायचा तो संघर्ष करूनच मिळवायचा याची खूणगाठ बांधून कर्मचाऱ्यांनी आपला लढा तीव्र करावा. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आव्हान आपचे सागर सोनवणे यांनी केले यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले.

आंदोलनांच्या ठिकाणी बोलताना “शिवशाही च्या राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांशी मोगलशाही सारखी वागणूक का दिली जात आहे?” असा सवाल आपचे जन उपसंपर्कप्रमुख स्वप्नील जेवले यांनी केला. या वेळी एसटी कर्मचारी ओमप्रकाश गिरी,विजय साबळे, निवृत्ती रोकडे, वाघेला सर आदी कर्मचारी व आपचे शहराचे कार्यकारी अध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे, जनसंपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाट, सागर सोनावणे, स्वप्नील जेवले आणि आदी कार्यकर्ते उपस्थित होते.