शस्त्र बाळगल्याप्रकरणी चाकण, चिंचवड मधून तिघांना अटक

0
357

चाकण, दि.५ (पीसीबी) – शस्त्र बाळगल्या प्रकरणी चाकण येथून दोघांना तर चिंचवड मधून एकाला अटक केली आहे. तिघांकडून तीन कोयते जप्त करण्यात आले आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 3) तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तोसिफ आयज शेख (वय 26), नजीर अमन मुल्ला (वय 37, दोघे रा. चाकण) या दोघांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी (दि. 3) दुपारी चार वाजता चाकण गावात माणिक चौक ते मच्छी मार्केट या रस्त्यावर लोखंडी कोयते घेऊन फिरत असताना दोघांना चाकण पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 200 रुपये किमतीचे दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

भूषण सुधरी गुंडगळ (वय 36, रा. थेरगाव) या आरोपीला चिंचवड पोलिसांनी अटक केली. आरोपी भूषण त्याच्या कारमधून कोयता घेऊन फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला अटक करून कारमधून दोन कोयते जप्त केले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.