शरद सातबारा मिळव, अजित धरण भर, सुप्रिया वांगी लाव ; भाजपचे राष्ट्रवादीला प्रत्युत्तर

0
614

मुंबई, दि, २४ (पीसीबी) – शरद सातबारा मिळव, अजित धरण भर भाजपने टीका करत राष्ट्रवादीच्या बालभारतीच्या संख्यावाचनाच्या टीकेला भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे.

काही दिवसांपूर्वी बालभारतीच्या संख्यावाचनाच्या मुद्यावरून कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपवर निशाणा साधला. त्यामध्ये प्रकाश FSI दे, सुभाष बेकायदा घर बांध, संभाजी बॅंक बुडव, दिलीप दारू विक, रणजित मालमत्ता लपव, जयकुमार रिसॉर्ट पचव, विष्णू रेनकोट घे, रवींद्र खंडणी आण, मदन भूखंड घे, बापट डाळ खा, विनोद अभ्यास कर, रावसाहेब साले म्हण, गिरीश आमदार पळव, चंद्रकांत रस्ता खोद, देवेंद्र क्लीन चीट दे, पंकजा चिक्की खा, अशी टीका राष्ट्रवादीने केली होती. दरम्यान या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपचे प्रवक्ते अवधुत वाघ यांनी १५ वर्ष महाराष्ट्र कसा लुटला? असा कॅप्शन असलेला फोटो शेअर केला आहे. इतकेच नव्हे तर शरद सातबारा मिळव, अजित धरण भर, सुप्रिया वांगी लाव, छगन सदन लुट, सुनील सिंचन कर, प्रफुल्ल विमान उडव, रमेश महामंडळ बघ, अशी टीका भाजपचे प्रवक्ते अवधुत वाघ यांनी केली आहे.