“शरद पवारांबद्दल आम्हाला आदर; पण सोनिया गांधीच आमच्या नेत्या आहेत’; आणखी ‘एका’ नेत्याची UPA बाबत ठाम भूमिका

0
294

सोलापूर, दि.२७ (पीसीबी) : संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांनी एक वक्तव्य केलं होत. त्याच्या वक्तव्यावरून संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात नंतर शाब्दिक चकमक झाली. आता या शाब्दिक चकमकीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही ‘शरद पवार यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण सोनिय गांधी याच आमच्या नेत्या आहेत.’ असं स्पष्ट करत त्यांनी आपली बाजू मांडली.

‘यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक मत आहे. शरद पवार यांच्याविषयी आम्हाला प्रचंड आदर आहे. महाविकास आघाडी एकत्र येण्यामध्ये देखील पवार साहेबांचे योगदान मोठे आहे. मात्र सोनिया गांधी या यूपीएच्या चेअरमन आहेत आणि त्याच आमच्या नेत्या असल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले.’