व्यावसायिकाच्या मुलाने बोलावली थायलंडची ‘कॉलगर्ल’; मात्र काही दिवसातच कोरोनामुळे झाला तिचा मृत्यू आणि…..

0
1342

लखनऊ, दि.१० (पीसीबी): जागतिक महामारीच्या भयंकर कोरोना संसर्गाच्या काळात लखनौच्या प्रसिद्ध व्यावसायिकाचा मुलगा खूप चर्चेत आला. ऑक्सिजनच्या प्रत्येक सिलिंडरसाठी लोक तळमळत असताना, लखनौच्या या व्यापाऱ्याच्या मुलाने थायलंड निवासी असलेल्या कॉलगर्ल ला दहा दिवसांपूर्वी दिल्लीमधून लखनऊला बोलावले होते. चार दिवसांपूर्वी, कोरोनाच्या संसर्गामुळे त्या मुलीच्या मृत्यूनंतर हे प्रकरण उघडकीस आले आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

लखनौवासीय कोरोना संसर्गामुळे त्रस्त आहेत. लोक सतत मरत आहेत. हजारो रूग्ण रूग्णालयात दाखल आहेत. दुसरीकडे राजधानीच्या एका मोठ्या व्यावसायिकाच्या मुलाने सगळ्यांची चिंता वाढवली आहे. मुलाने एका युवतीला थायलंडहून लखनौला सात लाख रुपये देऊन बोलावले. शिवाय त्या मुलीला हजरतगंज येथे थांबवले. दरम्यान, जेव्हा या युवतीला कोरोना संसर्ग झाला तेव्हा व्यापारी मुलाने हात वर केले. 28 एप्रिलपासून थायलंडमध्ये राहणारी मिस पियाथिडा यांचे लोहिया रुग्णालयात दाखल, 3 मे रोजी निधन झाले.

मुलगी दिल्लीहून लखनऊ येथे आली होती: तपासात असे आढळले आहे की पियाथिडा नावाच्या महिलेची प्रकृती ठीक नसल्याने राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. निरीक्षक विभूतींद्र चंद्रशेखर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या मृत्यूची माहिती उच्च अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर थायलंडच्या दूतावासाला माहिती देण्यात आली. विभूतीखंड पोलिसांनी थायलंड दूतावासाच्या परवानगीने 6 मे रोजी पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.