वोक्सवॅगननंतर महिंद्रा कंपनीकडून पिंपरी पोलीस आयुक्तालयाला ५ गाड्या गिफ्ट

0
743

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – शासनाचे दुर्लक्ष असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला सरकारी मदती पेक्षा खाजगी क्षेत्रातून जात मदत होत असल्याचे चित्र आहे. गुरुवार (दि.४) रोजी वोक्सवॅगन या अंतरराष्ट्रीय कार निर्मिती करणाऱ्या कंपनीने त्यांच्या CSR (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) फंडातून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातला सहा महागड्या कार भेट म्हणून दिल्या होत्या.

त्या पाठोपाठ आज (बुधवार) महिंद्र या भारतीय कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद महिंद्रा यांनी आयुक्तालयाला पाच बोलेरो जीप भेट म्हणून दिल्या आहेत. यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला राज्य शासनापेक्षा खाजगी कंपन्या भरगोस मदत करताना दिसत आहे. मात्र ही मदत निस्वार्थ असणे गरजेचे. तसेच मिळालेल्या वाहनांच्या मदतीने आयुक्त कारवायांना किती गती देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.