वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्ट च्या वतीने पंढरपूर येथे आरोग्य सेवा सुरू

0
390

निगडी, दि. १३(पीसीबी) -निगडी येथील वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्ट च्या वतीने पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी, श्रावणी,कार्तिकी, माघी,चैत्री, एकादशीला मोफत आरोग्य सेवा सुरू आहे. यावेळी हजारो वारकरी बांधवांनी या सेवेचे लाभ घेतला, अशी माहिती ट्रस्ट चे प्रमुख मुकेश सोमय्या यांनी दिली.

गेल्या २८ वर्षा पासून पंढरपूर ला आषाढी, श्रावणी,कार्तिकी, माघी,चैत्री, एकादशीला पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराला येणाऱ्या वारकरी बांधवांच्या सेवे साठी मोफत वैद्यकीय मदत करणाऱ्या वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्ट चे सेवक,
सध्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात २४ तास वारकर्यांंची सेवा दर्शन बारीत चालू आहे, असे मुकेश सोमैय्या यांनी सांगितले.