…तर आगामी काळात मनसे बरोबर भाजपाची युती

0
190

मुंबई, दि. १३ (पीसीबी) : राज ठाकरे यांची भूमिका भाजपशी जुळती राहिली तर येत्या निवडणुकांमध्ये मनसे भाजप सोबत असेल असं वक्तव्य भाजपनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘भाजपच्या नेत्यांनी अडकावण्याचा प्रयत्न होता, महाविकास आघाडीचे नेते आत आहेत म्हणून खोटे गुन्हे माझ्यावर दाखल केले असा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला. आगामी काळात राज्यातील प्रमुख १८ महापालिका, ३६ जिल्हापरिषदा तसेच पंचायत समित्या, नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. भाजपा विरोधात महाआघाडी सरळ सामना झालाच तर भाजपाला रोखणे सहज शक्य आहे. अशा परिस्थितीत मनसे भाजपा बरोबर असेल तर महाआघाडीला तोंड देणे थोडे सोपे होईल असा भाजपाचा कयास आहे.

‘किरीट सोमय्या हा पळणारा नेता नाही, भ्रष्ट्राचार करणाऱ्यांना पळून लावणारा नेता आहे.’ सेशन कोर्टात जामीन मिळाला नाही तर उच्च न्यायालयात जामीन मागतील असंही ते यावेळी म्हणाले. राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यानंतर ज्या प्रतिक्रिया आल्या त्याचा समाचार त्यांनी घेतला आहे. सुप्रिया सुळे, अजित पवार, शरद पवार यांनी केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले. शरद पवार यांच्या घरावरील मोर्चा महाविकास आघाडीचा डाव होता का असा सवाल उपस्थित होतो अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर दिली.

तर, भोंग्यांच्या संदर्भात बाळासाहेब ठाकरे यांनी देखील ही भूमिका घेतली होती. RSS विश्वहिंदू परिषदेनेही भोंग्यांबाबत हीच भूमिका तेव्हाही तीच होती आणि आताही तीच आहे. कायदा हा सर्वांसाठी समान आहे. भोंग्यांच्या आवाजाने प्रदूषण होत असेल तर कारवाई व्हायला हवी. शरद पवार यांच्या कार्यपद्धतीची माहिती राज ठाकरे यांनी करून दिली आहे. घरात धाडी पडल्या तरीही मोदींशी मधुर संबंध कसे असू शकतात हे सांगत राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. राराज ठाकरे यांची भूमिका भाजपशी जुळती राहिली तर येत्या निवडणुकांमध्ये मनसे भाजप सोबत असेल असं मोठं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलं.