वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड करा उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यालाही पाठवले अजित पवारांनी पत्र

0
192

पुणे, दि. २८ (पीसीबी) -पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव बदलून राजगड असे करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहिले आहे.

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव बदलून राजगड असे करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहिले आहे.

अजित पवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे जिल्हयातील वेल्हे तालुक्याचे नामांतरण राजगड तालुका करण्याबाबत लोकभावना तीव्र आहेत. याबाबत पुणे जिल्हा परिषदेच्या २२ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या सर्वसाधारण सभेत ठराव करुन वेल्हे तालुक्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी ५८ ग्रामपंचायतींना वेल्हे तालुक्याचे नाव राजगड असे करणेबाबत सकारात्मक ठराव दिले आहे.

वेल्हे तालुक्यामध्ये स्थित असलेल्या राजगड या किल्ल्याशी तालुक्यामधील तमाम नागरिकांचे जिव्हाळयाचे संबंध असून सदर किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम राजधानी असलेने सदर ठिकाणावरुन छत्रपती शिवाजी महाराज यांनी २७ वर्षे शासन चालविले असल्याने वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड असे करण्यात यावे अशी वेल्हे तालुक्यातील नागरिकांची तीव्र इच्छा आहे, असेही अजित पवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.