वृद्धाश्रमातील जेष्ठ निराधार महिलांना नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांनी घडविली ‘मेट्रो सफर’

0
333

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – जागतिक महिला दिनानिमित्त श्री शंकर महाराज सेवा मंडळ, चिंचवड संचलित ‘स्नेहसावली-आपलं घर’ या वृद्धाश्रमातील जेष्ठ निराधार महिलांना नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांनी ‘मेट्रो सफर’ घडवून आणली. वृद्धाश्रमातील जेष्ठ महिलांना ‘मेट्रोत प्रवास करण्याचा आनंद मिळावा याकरिता नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे वाहन व्यवस्था केली होती.

या मेट्रो सफर आनंद घेतल्यावर सर्व जेष्ठ महिलांना आनंदाश्रू आवरले नाहीत व मेट्रो सफर घडवून आणल्याबद्दल ॲड.मोरेश्वर शेडगे यांचे आभार मानले व त्यांना अनेक आशिर्वाद देखिल दिले.

वृद्धाश्रमातील जेष्ठ निराधार महिलांना मेट्रो सफर घडवून आणण्यासाठी त्यांना श्री शंकर महाराज सेवा मंडळ व स्नेहसावली-आपलं घर’ या वृद्धाश्रमाचे मुख्य विश्वस्त डॅा.अविनाशजी वैद्य व ‘स्नेहसावली-आपलं घर’ या वृद्धाश्रमाच्या विश्वस्त सौ.आशाताई पात्रुडकर मॅडम यांनी विशेष सहकार्य केले.