महिलांनी व्यक्त व्हायला शिकले पाहिजे – चितोडकर

0
520

पिंपरी, दि. ९ (पीसीबी)- महिलांनी व्यक्त व्हायला शिकले पाहिजे. मन मोकळे करून बोललं पाहिजे. भावना, राग दाबून न ठवता व्यक्त झाल्याने खूप बरं वाटत असे मार्गदर्शन समुपदेशीका सरिता चितोडकर यांनी केले.

श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान संचालित जेष्ठ नागरिक संघ शिवतेजनगरच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त महिलांसाठी समुपदेशीका सरिता चितोडकर यांचे “आयुष्याचा सुखद उत्तरार्ध “या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमांची सुरवात झाली. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर, नगरसेविका मंगला कदम होत्या. माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे प्रमुख उपस्थित म्हणून उपस्थित होते. जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष प्रा. हरीनारायण शेळके यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. याप्रसंगी अर्चना तौडकर, कुशाग्र कदम उपस्थित होते.

नगरसेविका मंगला कदम म्हणाल्या, महिलांनी आपल्या इच्छेप्रमाणे जीवन जगावे. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करावयात. नारायण बहिरवाडे म्हणाले, महिलांचे सक्षीमीकरण होत असून सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. पुरुषाच्या बरोबरीने काम करीत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. हरीनारायण शेळके यांनी केले. तर, सूत्रसंचालन सारिका रिकामे यांनी केले.. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सदाशिव पाटील, शिंदे सर, शोभा नलगे, मनीषा देव, नीता खरे, कांचन नेवे यांनी परिश्रम घेतले.