वीज बिलाचा पुन्हा एकदा जबर फटका….

0
260

मुंबई, दि.२७ (पीसीबी) : कोरोनाचा फायदा उचलत खुप जनांनी आपले खिसे भरले. सेलिब्रिटीं सुद्धा याला आता अपवाद उरले नाहीयेत. आता या वाढत्या वीज बिलाचा फटका भारतीय फिरकीपटू क्रिकेटर हरभजन सिंग यांना देखील बसला आहे. वीज कंपनीकडून त्यांना भरभक्कम बिल पाठवण्यात आलं आहे. खुद्द हरभजन सिंग यांनी त्यांना आलेलं वीज बिल सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केलं आहे. बिलासंबंधीचा मेसेज त्यांनी तसाच्या तसा ट्विट केला असून याबद्दल ‘अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड’ला या संदर्भात खडेबोल सुनावले आहेत.

‘अख्ख्या मोहल्ल्याचं पाठवलं का?’ असं ट्विट करत त्यांनी आपल्या बिलाची रक्कम सांगितली आहे. हरभजनल यांना ३३९०० रूपये इतकं वीज बिल आलं असून अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड यांनी हे बिल भरण्यासाठी त्यासाठी १७ ऑगस्टपर्यंतचा कालावधी दिला आहे.