विहिरीत आढळले आईसह चार मुलींचे मृतदेह

0
455

माळेगाव, दि.२३ (पीसीबी) – विहिरीत आईसह चार मुलींचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील माळेगावात घडली आहे. ही आत्महत्या आहे की, हत्या हे अद्याप उघड झाले नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

आई उज्वला ढोके (वय ३५), मुलगी वैष्णवी ढोके (वय ९), दुर्गा ढोके (वय ७), आरुषी ढोके (वय ४), पल्लवी ढोके (वय १ वर्षे (एक वर्ष) अशी असे या मृत व्यक्तींची नावे आहे.

मिळालेल्या या माहितीनुसार, मेहेकर तालुक्यातील माळेगाव परिसरात असलेल्या एका विहिरीत सोमवारी सकाळी पाच मृतदेह तरंगत असल्याचे शेतकऱ्यांना दिसले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. हे वृत्त गावात धडकताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, विहिरीत आढळलेले पाच मृतदेह एका आईसह चार मुलींचे आहे. गावकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले असून, शवविच्छेदनासाठी पाठवले जाणार आहेत  अशी माहिती मिळत आहे. त्यांनी आत्महत्या केली की, त्यांची हत्या करण्यात आली, हे अद्याप  समजू शकले नाही, पोलिसांनी घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.