विराट कोहलीच्या अंगठ्याची दुखापत गंभीर नाही

0
463

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – सरावादरम्यान कर्णधार विराट कोहलीच्या अंगठ्याला झालेली दुखापत गंभीर नसून, त्याला पहिल्या सामन्यासाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे.  संघाचे फिजीओ पॅट्रीक फराहत यांनी विराटवर उपचार करत त्याला मैदानाबाहेर नेले. त्यामुळे ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात विराट कोहली खेळणार आहे.

बीसीसीआयमधील सुत्रांनी  दिलेल्या  माहितीनुसार  विराटने पुन्हा एकदा नेट्समध्ये येऊन सरावाचे सत्र पूर्ण केले आहे. त्यामुळे पहिल्या सामन्याआधी भारतीय संघाचा जीव भांड्यात पडला आहे. विराट कोहली गेल्या वर्षभरात चांगल्या फॉर्मात आहे.

विश्वचषकासाठी भारताने समतोल संघाची घोषणा केली आहे. स्पर्धा सुरु होण्याआधी झालेल्या दोन सराव सामन्यांमध्ये भारताला एका सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात विराट कोहली मैदानात कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.