विनापरवाना गोमांस वाहतूक प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
287

चाकण, दि. १४ (पीसीबी) – विनापरवाना गोमांस वाहतूक केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेजण एका टेम्पोमधून एक हजार 100 किलो वजनाचे गोमांस घेऊन जात होते.

याबाबत संतोष विजय साळवी (वय 40, रा. भोसरी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 13) फिर्याद दिली आहे. त्यानुसार एम एच 03 / सी पी 9876 या क्रमांकाच्या टेम्पो चालक आणि क्लिनर व इतर साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी टेम्पो चालक व क्लिनर हे विनापरवाना त्यांच्या टेम्पोतून एक हजार 100 किलो वजनाचे गोमांस घेऊन जात होते. याबाबत फिर्यादी यांना संशय आल्याने त्यांनी टेम्पो थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी टेम्पो वेगाने पळवून चाकण शिक्रापूर रोडवर एका ढाब्याच्या समोर थांबवून अंधाराचा फायदा घेऊन आरोप पळ काढला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.