विद्यार्थिनींच्या रूममध्ये शिरले चोरटे आणि….

0
215

फुगेवाडी, दि. ३० (पीसीबी) – फुगेवाडी येथे एका विद्यार्थिनीच्या रूममध्ये उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून २१ हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 20) पहाटे घडली असून याबाबत नऊ दिवसानंतर सोमवारी (दि. 29) भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभांगी बालाजी माने (वय 21, रा. महाराणी मित्र मंडळ, डोंगरेवाडा, फुगेवाडी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माने यांच्या घरात उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल फोन, पर्स, आधारकार्ड, मनगटी घड्याळ असा एकूण 21 हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार 20 मार्च रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.