घरफोडी करून ‘एवढ्या’ हजारांचे दागिने चोरीला

0
516

आळंदी, दि. ३० (पीसीबी) – अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 49 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना देवाच्या आळंदीत बुधवारी (दि. 24) दुपारी तीन ते पाच वाजताच्या कालावधीत घडली आहे. याबाबत अज्ञात चोरट्याच्या विरोधात सोमवारी (दि. 29) आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनीता जितेश डांगे (वय 55, रा. वडगाव रोड, आळंदी) यांनी याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डांगे यांचे घर बुधवारी दुपारी तीन ते पाच वाजताच्या सुमारास कुलूप लावून बंद होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट तोडून कपाटामधून 49 हजार 500 रुपये किमतीचे 19.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.