लाखो रुपयांच्या गुटख्याची साठवणूक केली खरी पण…

0
195

हिंजवडी, दि. २४ (पीसीबी) – विक्रीसाठी आणलेला सव्वा लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी पकडला. शनिवारी (दि. 22) दुपारी एक वाजताच्या सुमारास सूसगाव येथे ही कारवाई करण्यात आली.

पारस खिमाराम देवासी (वय 27, रा. सूसगाव, ता. मुळएमएचशी, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रीसाठी गुटख्याची साठवणूक केल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकास मिळाली. त्यानुसार शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पोलिसांनी छापा घातला. त्यावेळी (एमएच 12 एचव्ही 3783) या मोटारीत एक लाख 27 हजार 216 रुपयाचा गुटखा हस्तगत केला. याप्रकरणी पोलिसांनी चार लाख 20 हजारांची मोटार, आरोपीकडून आठ हजार रुपयांचा मोबाइल असा एकूण पाच लाख 55 हजार 216 रुपयांचा ऐवज हस्तगत केला. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.