फ्लॅटचे अमिश दाखवत ‘अशी’ केली 11 लाखांची फसवणूक

0
316

भोसरी, दि. २४ (पीसीबी) – फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून दोघांनी 11 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना एमआयडीसी भोसरी येथे घडली.

मोहन दादासाहेब शिंदे (वय 54, रा. फातिमानगर, वानवडी, पुणे) यांनी शनिवारी (दि. 22) याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिगंबर ज्ञानदेव पाटील (रा. निगडी प्राधिकरण), कृष्णा प्रसाद (रा. इंद्रायणीनगर, भोसरी, प्राधिकरण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना 2013 ते 22 मे 2021 या कालावधीत एमआयडीसी भोसरी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून फ्लॅट देण्याचे आमिष दाखवले. तसेच त्यांच्याकडून 11 लाख रुपये घेतले. मात्र विहित मुदतीत फ्लॅट न देता विश्वासघात करून फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.