“वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार

0
313

पुणे, दि. ९ (पीसीबी) : “वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत. आमची दुश्मनी कधीच नव्हती. आमच्या नेत्याची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते. जर मोदीजींनी तशी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार आहेच”, असं स्पष्ट आणि थेट विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. ते पुण्यात बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत झालेली बंद दाराआढ बैठकीनंतर, चंद्रकांत पाटलांच्या या विधानाला महत्तवं आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “आमची वाघाशी दोस्ती आहेच. उद्धव ठाकरे म्हणातात त्यांचं मोदीजींशी जमतं, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी जमतं नाही. का ते माहीत नाही. पण वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत”. पुण्यातील एका कार्यक्रमात वन्यजीव अभ्यासक अनुज खरे यांनी चंद्रकांत पाटील यांना वाघाची प्रतिकृती भेट दिली. त्याचा संदर्भ घेऊन चंद्रकांत पाटील बोलले.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

वाघाशी दोस्ती करावी यासाठी मला वाघ भेट दिला, पण वाघाशी आमची दुश्मनी कधीच नव्हती. उद्धवजीं जुनी मैत्री मोदीजींशी आहे असं सांगितलं. त्यांचं म्हणणं फडणवीस-पाटलांशी जमत नाही. इकडे दोस्ती असती तर 18 महिन्यापूर्वीच सरकार आलं असतं. मोदींनी जर सांगितलं, त्यांची इच्छा असेल तर त्यांची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा. मोदींजींनी आदेश दिल्यावर काय वाटेल ते करु. जरी भाजप-शिवसेनेचं सरकार आलं, असं मी म्हणत नाही, पण तुम्ही ज्या चर्चा करताय, त्यानुसार जरी सरकार आलं तरी निवडणुका वेगळ्याच होणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

ठाकरे-मोदी भेटीवर प्रतिक्रिया
यावेळी चंद्रकात पाटील यांनी ठाकरे-मोदी भेटीवरही भाष्य केलं. “दोन व्यक्तींची भेट झाली त्यात काय चर्चा झाली ते आपल्याला कसं समजणार”, असं ते म्हणाले. शिवाय 12 आमदारांचा प्रश्न मोदींचा नव्हे तर राज्याचा असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलं. मराठा आरक्षणावरुन दिशाभूल दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील मराठा समाजाची दिशाभूल केली जातेय, पंतप्रधानाकडे यासंदर्भात काहीच नाही. मराठा समाज हा मागास आहे हे आधी ठरवावं लागेल. राज्य सरकारकडून धूळफेक सुरू आहे, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या सवलती मराठा समाजाला दिल्यात त्या तरी द्या, अशी मागणीही त्यांनी केली. ओबीसींचे राजकीय आरक्षण गेलं ते फक्त महाराष्ट्रात गेलं त्याला मोदी काय करणार असाही सवाल त्यांनी केला.