वाकड येथे तरुणीच्या मोबाईलवर अश्लिल मेसेज पाठवणाऱ्यावर गुन्हा

0
599

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – तरुणीच्या मोबाईलवर अश्लिल मेसेज पाठवणाऱ्या अज्ञात मोबाईल क्रमांक धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवार (दि.२९ मार्च) दुपारी पावनेदोन ते सोमवार (दि.१ एप्रिल) सायंकाळी साडेचारच्या दरम्यान घडली.

याप्रकरणी २४ वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात तीन मोबाईल क्रमांक धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि.२९ मार्च) दुपारी पावनेदोन ते सोमवार (दि.१ एप्रिल) सायंकाळी साडेचार या कालावधीत अज्ञात तीन मोबाईल क्रमांकधारकांनी २४ वर्षीय तरुणीच्या मोबाईलवर वेळोवेळी अश्लिल मेसेज पाठवून विनयभंग केला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक टि.एस.भोगम तपास करत आहेत.