तुम्ही देशाबरोबर आहे की देशद्रोहींबरोबर ?; मोदींचा काँग्रेसवर निशाणा  

0
481

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रसिध्द केलेल्या जाहीरनाम्यावर पंतप्रधान मोदी यांनी सडकून टीका केली आहे. काँग्रेस देशाबरोबर आहे की देशद्रोहींबरोबर आहे, असा सवाल करून ‘भारत तेरे टुकडे होंगे’ ही घोषणा देणारे, तिरंगा जाळणारे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे विद्रुपीकरण करणाऱ्यांबाबत काँग्रेसला सहानुभूती आहे, असा आरोप मोदी यांनी केला.

अरुणाचल प्रदेशमधील पासीघाट येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आयोजित केलेल्या  एका सभेत मोदी बोलत होते.

मोदी म्हणाले की, काँग्रेसचे घोषणापत्र हे ‘ढकोसलापत्र’आहे. एकीकडे निश्चयी सरकार आहे तर दुसरीकडे खोटी आश्वासने देणारे नामदार आहेत. त्यांच्या जाहीरनाम्यात सर्व फसवी आश्वासने आहेत. त्यांना जाहीरनामा नव्हे तर ‘ढकोसलापत्र’ म्हटले पाहिजे, असे ते म्हणाले.  ही निवडणूक संकल्प आणि कट, भ्रष्टाचार आणि विश्वास यांच्यातील निवडणूक आहे, असे मोदी म्हणाले.