‘वडिलांचं मृत्यूपत्रच बनावट आहे’ म्हणत मुलाने केली तब्बल सात जणांविरुद्ध फसवणुकीची तक्रार

0
288

पिंपरी, दि.31 (पीसीबी) : एका व्यक्तीच्या को-या कागदावर सह्या घेऊन तसेच खोटे मृत्युपत्र तयार करून गाळा नावावर करून घेत एका व्यावसायिकाची फसवणूक केली. याबाबत सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंत हरिभाऊ गोसावी (वय 46), सुजाता हेमंत गोसावी (वय 40), तेजस हेमंत गोसावी (वय 19, तिघे रा. चिंचवड), संदीप गणेश आंबेकर (वय 40, रा. नारायण पेठ, पुणे), डॉ. रमेश एस बंसल (वय 69, रा. देहूरोड), आशिष अंबिके (वय 48, रा. मंगळवार पेठ, पुणे), गणेश मुके (वय 36, रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत संतोष शांताराम गोसावी (वय 45, रा. प्राधिकरण निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या वडिलांना खोटे सांगून त्यांच्या को-या कागदावर सह्या घेतल्या. त्याद्वारे राजेशभवन बिल्डिंग, आकुर्डी येथील गाळा क्रमांक दोनचे बोगस, खोटे मृत्युपत्र आरोपी हेमंत, सुजाता आणि तेजस यांच्या नावाने तयार करून घेत फिर्यादी संतोष यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.