वंशाच्या दिव्यापेक्षा मुलीच बऱ्या; सुप्रिया सुळेंचा राणाजगजितसिंह पाटलांवर निशाणा

0
647

नवी मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – वंशाच्या दिव्यापेक्षा मुलीच बऱ्या, त्या बापाला कुणापुढे झुकायला तरी लावत नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उस्मानाबादमधील  राष्ट्रवादी काँग्रेस नेते व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधला.

सुप्रिया सुळे  नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात बोलत होत्या.

यावेळी त्या म्हणाल्या की. वंशाचे दिवे   वडिलांचे काय होते,  यापेक्षा स्व:तचा विचार करतात. आपल्या करियरसाठी ते त्यांना ढकलून द्यायलाही तयार होतात.   कुठल्याही वडिलांना असा दिवस बघायची वेळ येऊ नये. ज्या वडिलांचे उभे आयुष्य ताठ मानेने जगण्यात गेले, आज त्यांची अवस्था पाहा. मात्र, त्यांची घालमेल मुलाला कळत नाही. ठेकेदरीसाठी मुलाने वडिलांना दुसऱ्या पक्षात जायला भाग पाडले.

दरम्यान जगजितसिंह राणा पाटील  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे मेव्हुणे पद्मसिंह पाटील यांचे पूत्र आहेत.  पद्मसिंह पाटील  राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. त्यामुळे पाटील घराण्याचा भाजप प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.