खासदार उदयनराजेंचा भाजप प्रवेश तांत्रिकदृष्ट्या कठीण

0
934

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) –  राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. परंतु  खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर  विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेची पोटनिवडणूक घेण्याची मागणी उदयनराजेंनी केली आहे.  परंतु ही मागणी पूर्ण होणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असल्याने उदयनराजेंचा  भाजप प्रवेश तूर्तास होणे कठीण असल्याचे बोलले जात आहे.

उदयनराजेंना भाजप प्रवेश  करण्याआधी त्यांना आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यांनतर ते पक्षांतर करू शकतात.  तसेच पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत प्रवेश व्हावा,  अशी उदयनराजेंची इच्छा आहे. पण त्यांना भाजप प्रवेश करण्याआधी खासदारकीचा राजीनामा देणे क्रमप्राप्त आहे.

दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेते आमदार  राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची  घोषणा केली आहे.  उस्मानाबाद येथे कार्यकर्त्यांचा मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली आहे. यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. अनेक नेत्यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला  खूप मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.