वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या उमेदवारांची पहिली यादी १० ऑगस्टला जाहीर करणार?

0
701

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने सर्व २८८ मतदारसंघातील  इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. काँग्रेस–राष्ट्रवादीने आघाडी करण्यासाठी तात्काळ भूमिका जाहीर न केल्यास  वंचित बहुजन आघाडी १० ऑगस्टला उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचा लोकसभा निवडणुकीत  काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसला आहे.   त्यामुळे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला महाआघाडीसोबत घेण्यासाठी काँग्रेस इच्छुक आहे. परंतु काँग्रेसने आधी ‘वंचित’ही भाजपची “बी टीम’ आहे . या आरोपाबद्दल माफी मागितल्याशिवाय आघाडीबाबत बोलणीच करणार नाही, असा पवित्रा आंबेडकर यांनी घेतला होता.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचे भाजप शिवसेनेत आऊटगोईंग सुरू असताना काँग्रेसचे काही आजी-माजी आमदार वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असल्याचा दावा वंचित आघाडीतून केला जात आहे. यामुळे काँग्रेसची आणखी कोंडी होण्याची शक्यता आहे.