लोहा नगरपरिषद, शेंदुर्णी आणि मौदा नगरपंचायतीवर भाजपचे कमळ फुलले

0
746

मुंबई, दि. १० (पीसीबी) – राज्यातील ६  नगरपरिषद/नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आज (सोमवार) निकाल लागला आहे.  भाजपने २  नगरपंचायतीसह १ नगरपरिषदेवर सत्ता  मिळवली आहे. नांदेडची लोहा नगरपरिषद, जळगावची शेंदुर्णी नगरपंचायत आणि नागपूरची मौदा नगरपंचायतीवर भाजपचे कमळ फुलले आहे. तर वाशिमच्या रिसोड नगरपरिषदेवर जनविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी नगरपरिषदेवर काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. त्याचबरोबर यवतमाळच्या नेर नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

यवतमाळ, नांदेड, नागपूर, वाशिम, चंद्रपूर आणि जळगाव या जिल्ह्यातील दोन नगरपंचायत आणि इतर ६ नगरपरिषदांचा निकाल आज जाहीर झाला आहे.

नगरपरिषद आणि नगरपंचायत निकाल –

नांदेड – लोहा नगरपरिषद (एकूण जागा १७)

भाजप १३ जागा

काँग्रेस ४ जागा

नगराध्यक्ष : गजानन सूर्यवंशी (भाजप)

वाशिम : रिसोड नगरपरिषद (एकूण जागा २०)

काँग्रेस ३ जागा

जनविकास आघाडी ९ जागा

शिवसेना-भाजप ३ जागा

भारिप २

अपक्ष ३

नगराध्यक्ष : विजयमाला कृष्णा आसनकर (जनविकास आघाडी)

चंद्रपूर : ब्रह्मपुरी नगरपरिषद (एकूण जागा २०)

भाजप ३ जागा

काँग्रेस ११ जागा

विदर्भ माझा पक्ष ६ जागा

नगराध्यक्ष : रिता उराडे (काँग्रेस)

जळगाव- शेंदुर्णी नगरपंचायत (एकूण १७ प्रभाग)

भाजप १३ प्रभाग

राष्ट्रवादी ४ प्रभाग

नगराध्यक्ष : विजया खलसे (भाजप)

शेंदुर्णी नगरपंचायतीचा गड राखण्यात यश गिरीश महाजनांना यश

यवतमाळ : नेर नगरपरिषद (एकूण जागा १८)

शिवसेना ९

काँग्रेस ३

अपक्ष ३

राष्ट्रवादी ३

नगराध्यक्ष : सुनीता जयस्वाल (शिवसेना)

नागपूर : मौदा नगरपंचायत (एकूण जागा १७)

भाजप ८

शिवसेना २

काँग्रेस५

इतर२

नगराध्यक्ष : भारती सोमनाथे (भाजप)