लॉकडाउनमध्ये सरकारी नियमानुसार कुर्बानीवर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही – नवाब मलिक

0
250

मुंबई,दि.२८(पीसीबी) – सध्या चालू असलेल्या लॉकडाउनमध्ये सरकारी नियमानुसार कुर्बानीवर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही, अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. बकरी ईद संदर्भातील आणि वाहतुकीबाबत सर्व गैरसमज दूर झालेले आहेत तसेच ज्यांनी ऑनलाईन बकरी बुक केली असेल त्यांनाही आता कोणतीही अडचण येणार नाही, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बकरी ईद साजरी करण्याबाबाबत ज्या अडचणी येत आहेत, त्याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. बकरी ईद संदर्भात सरकारने काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सर्व सूचनांचे पालन करून नागरिकांनी बकरी ईद साजरी करण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.