लुच्चे लफंगे यांचे तोंड आता परळीच्या महिला भगिनीच बंद करतील; पंकजा यांची धनंजय मुंडेंवर टिका

0
560

बीड, दि. ९ (पीसीबी) – लुच्चे लफंगे यांचे तोंड आता परळीच्या महिला भगिनीच बंद करतील अशी बोचरी टिका राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडें यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंवर केली आहे. परळी येथे आयोजित उमेद व पशू संवर्धन विभागाच्या वतीने बचत गटांच्या महिलांना दुधाळ गायीचे वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

या वेळी राज्याचे पशू संवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर देखील उपस्थित होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्ही मला लक्ष्मी म्हणता मी तुम्हाला लक्ष्मी म्हणून नमन करते. लक्ष्मी ही स्वच्छ कारभार करणाऱ्यालाच आशीर्वाद देते. तुम्हीं मला ताकत दिली तर तुम्हाला ताईच्या पाठिमागे उभे रहावे लागेल. भविष्यात मी सेवा करेल, भविष्य घडवायच गोठयातली गाय आणि घरातली माय सुखी रहावी यासाठी काम करेल असेही त्या म्हणाल्या.

निवडणुकीच्या आदल्या दिवशी घड्याळवाल्यांनी तुमच्या नवऱ्यांना दारू मटण खाऊ घालून पाठवल तर तेव्हा तुम्ही काय कराल? आपल्या नवऱ्यांना म्हणा की, भाकरी दुधात चुरुन न खाता दारूत चुरुन खा? आणि भाकरी सुध्दा स्वतःच बनवा? असे त्यांनी म्हणताच एकच हशा पिकला.