अमेरिकेने एकादशीला उपग्रह सोडल्याने त्यांचा प्रयोग यशस्वी – संभाजी भिडे

0
517

सोलापूर, दि. ९ (पीसीबी) – अमेरिकेने एकादशी दिवशी उपग्रह सोडला कारण त्या दिवशी ब्रह्मांडातील स्थिती संतुलित असते. त्यामुळे तो प्रयोग यशस्वी झाला, असे मत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी व्यक्त केले आहे. ते  सोलापुरातील दुर्गामाता दौड या कार्यक्रमाच्या बैठकीत बोलत होते.

नवरात्रीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या वतीने राज्यभर दुर्गामाता दौड होणार आहे त्यासाठी सोलापुरात आयोजित बैठकीला संभाजी भिडे आले होते. यावेळी त्यांनी मिशन चंद्रयानबद्दल आपले मत व्यक्त केले.

भिडे म्हणाले, भारतीय कालमापन पद्धतीला जगात तोड नसून एक सेकंदांचा हजारावा भाग मोजण्याची पद्धत सुद्धा भारतीय कालपमापन पद्धतीमध्ये आहे, असे संभाजी भिडेंनी सांगितले आहे. अमेरिकेने कालमापन पद्धतीचा वापर केल्यामुळे त्यांचा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयोग यशस्वी झाला.

तसेच अमेरिकेने एकादशी दिवशी उपग्रह सोडला कारण त्या दिवशी ब्रह्मांडातील स्थिती संतुलित असते. त्यामुळे तो प्रयोग यशस्वी झाला, असेही संभाजी भिडे यावेळी म्हणाले.