“लालू यादव तीन वर्षानंतर तुरूंगातून बाहेर”

0
302

पाटणा, दि.३० (पीसीबी) : रांची येथील होटवार कारागृह अधीक्षकांनी सादर केलेल्या सुटकेच्या आदेशानंतर राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यांना नवी दिल्लीच्या अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतून (एम्स) सोडण्यात येईल आणि ते राज्यसभेचे खासदार आणि त्यांची मुलगी मीसा भारती यांचे शासकीय निवास स्थानीच राहतील. कोरोनाचा प्रादुर्भाव सर्व देशभर वाढतअसल्याने त्यांचे इतर आजार पाहता लालू यादव यांच्या कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला आहे.

लालूंच्या कुटूंबातील निकटवर्तीय व राजदचे प्रवक्ते चित्ररंजन गगन यांनी सांगितले की एम्स दिल्ली येथील डॉक्टरांनी लालूंना घरीच राहू दिले आहे. लालूंच्या प्रकृतीची पाहणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिल्लीत राहण्याची परवानगी दिली आहे. एम्स रूग्णालयात कोरोनाची गंभीर स्थिती पाहता त्यांना घरी ठेवणे शहाणपणाचे ठरेल, असे लालूंच्या कुटुंबियांचे मत झाले आहे. राज्य सभा खासदार असलेली त्यांची मोठी कन्या मीसा भारती यांच्या शासकीय निवासस्थानी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे, ‘असं गगन म्हणाले.
दुमका, चाईबासा आणि देवघर कोषागारांमधून चुकीच्या पद्धतीने पैसे काढल्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री दोषी ठरले आहेत. रांची येथील विशेष सीबीआय कोर्टाने यापूर्वीच त्यांना चाईबासा आणि देवघरमधील दोन प्रकरणांमध्ये जामीन मंजूर केला आहे.

१९९१ ते १९९६ पर्यंत लालू प्रसाद मुख्यमंत्री असताना बिहार पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुमका, चाईबासा आणि देवघरच्या तिजोरीतून पैसे काढले होते. सन २००० मध्ये बिहारमधून झारखंड राज्य कोरण्यात आले होते. लालू प्रसाद यांना प्रकृतीच्या गंभीर स्थितीमुळे रांचीच्या प्रादेशिक वैद्यकीय विज्ञान संस्थान वरून एम्स दिल्ली येथे हलविण्यात आले होते. त्यांना मूत्रपिंडातील गंभीर संक्रमण आणि फुफ्फुसांमध्ये पाणी साचण्यासह अनेक आजारांनी ग्रासले आहे.