लॉकडाऊन काळात अनाथ मुलांना ‘तर्पण’ देणार साथ

0
225

महाराष्ट्र, दि. ३० (पीसीबी) – महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बालगृहांमध्ये असलेल्या १८ वर्षे वयाच्यावरील अनाथ मुलांचे भविष्य घडवण्यासाठी तर्पण फाऊंडेशनची स्थापना झाली असून सध्या राज्यभर सुरू असलेल्या कोरोना लॉकडाऊनच्या काळात या मुलांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचा निर्णय तर्पण फाउंडेशनने घेतला आहे. त्यासाठी तीन हेल्पलाइन नंबरही जाहीर करण्यात आले आहे.

तर्पण फाउंडेशनच्या सर्व संचालकाची 2५ नुकतीच ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये फाउंडेशनचे कार्यकारी संचालक श्रीकांत भारतीय, मुख्य कार्यकारी अधिकारी सारीका महोत्रा, वरिष्ठ संचालक श्रेया भारतीय, गगन महोत्रा, मनोज पांचाळ, अभय तेली, डॉ. महेंद्र गुजर, अजित चव्हाण यांच्यासह राज्यभरातील ५३ संचालक सहभागी झाले होते. महाराष्ट्र शासनाने राज्यभरात कडक लॉकडाऊन जाहिर केल्यानंतर वेगवेगळ्या बालगृहात असलेल्या अनाथ मुलांची काही गैरसोय होईल का? त्यांच्या पुढे काही प्रश्न निर्माण होतील का? या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी तर्पणच्या वतीने ही तातडीची सभा बोलावण्यात आली होती. वेगवेगळ्या जिल्ह्यातील तर्पणचे संचालक यांनी आपल्या जिल्ह्यातील बालगृह, महिला व बालविकास विभाग आणि या संबंधीत असलेल्या सर्व यंत्रणांशी संपर्क साधून प्रत्येक जिल्ह्यात १८ वर्ष वयाच्या पुढील अनाथ मुलं-मुली किती आहेत? याचा शोध घ्यावा. त्यांना सध्याच्या परिस्थितीत जीवनावश्यक गोष्टींची काही आवश्यकता आहे का? या संदर्भात विचारणा करावी आणि त्यानुसार कराव्या लागणाऱ्या उपाय योजनांची माहिती तर्पण फाऊंडेशनकडे सादर करावी. आपआपल्या विनिमय जिल्हास्तरावर या मुलांसाठी ही वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांकडून आली किंवा दानशूर व्यक्तीकडून काही मदत मिळवून देता येईल का? या संदर्भात प्रयत्न करावेत असे आवाहन तर्पणचे कार्यकारी संचालक श्रीकांत भारतीय यांनी केले . अशा मुलांच्या काही वैद्यकिय उपचारा विषयी तक्रारी असतील तर त्या संदर्भात प्राधान्याने उपाय योजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या .

अनाथ बालकांना समस्या असतील तर संपर्क साधा शहरी व ग्रामीण भागात बालकांशी निगडीत समस्या असतील तर तर्पण फाऊंडेशनपर्यंत पोहोचवाव्यात. त्यासाठी राज्यस्तरीय अनाथ सल्लागार समितीचे सदस्य अभय तेली यांचा (मो. क्र.९१५२९७३००३/९१५२९८७००३) तसेच नारायण इंगळे यांचा (मो.क्र.९१५२९ ४२००३) या क्रमांकावर कार्यकारी संपर्क साधावा. गरजवंत असलेले यांनी अनाथ मुल-मुलीही या क्रमांकावर वैद्यकिय संपर्क करु शकतात, असे आवाहन संस्थेच्या वतीने श्रीकांत भारतीय यांच्या वतीने करण्यात आले आहे .