लाथा-बुक्यांनी मारहाण करणाऱ्या भाजप आमदाराला राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांने बांधली राखी

0
544

अहमदाबाद, दि. ३ (पीसीबी) – गुजरातमधील भाजपचे आमदार बलराम थवानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या नीतू तेजवानी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या गंभीर घटनेनंतर नीतू यांनी मारहाण करणाऱ्या आमदार थवानी यांनाच राखी बांधली. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  

थवानी यांनी रुग्णालयात जाऊन नीतू यांची भेट घेतली. त्यावेळी पीडित महिलेने त्यांना राखीही बांधली. त्यानंतर ते म्हणाले की, ती माझ्या बहिणीसारखी आहे. काल जे काही झाले त्याबद्दल मी तीची माफी मागितली आहे. त्यामुळे आमच्यामधील गैरसमज आता दूर झाले आहेत. तिला काही मदत लागली, तर मी सदैव तयार असेल असे वचनही तिला दिले आहे.

पाणी टंचाईची तक्रार करण्यासाठी नीतू तेजवानी नरोडामधील नागरिकांसोबत सोमवारी बलराम थवानी यांच्या कार्यालयात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी बलराम हाय हायच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. दरम्यान, बलराम थवानी आणि त्यांच्या समर्थकांकडून नीतून यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.