लाच म्हणून मंत्र्यांकडून दोन बॉलिवूड अभिनेत्रींची मागणी; सुब्रमण्यम स्वामींचा गौप्यस्फोट

0
538

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – वादग्रस्त विधान करून वाद ओढावून घेणारे भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आता आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. लाच म्हणून एका मंत्र्याने दोन बॉलिवूड  अभिनेत्रींची  मागणी केलेली आहे. त्यामुळे या मंत्र्यावर काय कारवाई करता येईल, याबाबत संशोधन करत आहे, अशा आशयाचे  ट्विट  सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.   

प्रकल्पाला मान्यता मिळवून  देण्यासाठी मंत्र्याने दोन  अभिनेत्रींची मागणी केली आहे. त्यामुळे या मंत्र्यावर कोणत्या कायद्याअन्वये कारवाई करता येईल? याबाबत मी अभ्यास करत आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

स्वामी यांच्या या ट्विटमुळे राजकीय आणि कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये मोठी खळबळ  उडाली आहे.  स्वामी यांनी आरोप केलेला मंत्री  कोण आहे, याबाबत त्यांनी काहीही  विधान केलेले नाही. त्यामुळे हा मंत्री कोण याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात असून चर्चेला वेग आला आहे.