‘रोड शो’ सुरू असताना तरूणाने अरविंद केजरीवालांच्या कानशिलात लगावली

0
495

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रोड शो करताना  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कानशिलात  एका तरूणाने आज (शनिवार) लगावली. सुरेश असे या तरुणाचे नांव असून त्याला  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

दिल्लीतील करमपुरा परिसरात   केजरीवाल यांच्या रोड शोचे आयोजन केले होते.  यावेळी केजरीवाल  समर्थकांना हात उंचावून अभिवादन करत असताना  लाल टी शर्ट घातलेल्या एका तरुणाने कारवर चढून केजरीवाल यांच्या कानशिलात लगावली. या हल्ल्यामुळे केजरीवाल  भांबावले.

यानंतर केजरीवाल यांच्या समर्थकांनी या तरुणाला पोलिसांच्या  ताब्यात  दिले.  या तरुणाला मोती नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून तिथे त्याची कसून चौकशी केली जात आहे.

या तरुणाचे नाव सुरेश असे आहे.  तो कैलाश पार्क येथे राहतो. केजरीवाल यांच्यावरील नाराजीतूनच त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, केजरीवाल यांच्यावरील हा हल्ला  म्हणजे  भाजपचे षडयंत्र आहे,  असा आरोप आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.