रेल्वे स्थानकांच्या खाजगीकरणाचा विचार नाही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

0
229

नवी दिल्ली, दि. 24 (पीसीबी) : देशातील काही रेल्वे स्थानकांचे खाजगीकरण करण्यात आले आहे का, असा प्रश्न खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सदनात उपस्थित केला होता. याचे उत्तर देताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की रेल्वे स्थानकांच्या खाजगीकरणाच्या कोणताही प्रस्ताव केंद्राकडे आलेला नाही.

स्टेशन विकास कार्यक्रमाअंतर्गत कंत्राटदारांना काही ठराविक काळासाठी रेल्वे परिसरातील भू – अवकाशचे पट्टा अधिकार देण्यात आले आहेत, पण त्याचा मालकी अधिकार रेल्वे प्रशासनाकडे राहील,

स्टेशन विकास कार्यक्रमाअंतर्गत रेल्वे प्रशासनाच्या अंतर्गत येणाऱ्या भू – अवकाशाचे काही भाग विकासासाठीपट्टा अधिकाराचा निर्धारित कालखंड संपल्यानंतर संबधित जागेवर असलेली संपत्ती रेल्वे प्रशासनाकडे पुन्हा सोपविली जाईल, असा खुलासा अश्विनी वैष्णव यांनी केला.