रेल्वे मंत्र्यांकडे बिनखात्याचे मंत्रीपद सोपवा – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे ट्विटने खलबळ – श्रमिक ट्रेन नऊ चक्क तासांनी पोचली, ८० लोक दगावले

0
294

जयपूर, दि. ३० (पीसीबी) – श्रमिक ट्रेनचे राजकारण आणखी तापणार असे दिसते. शिवसेना आणि भाजपामध्ये गेले आठवडाभर त्या मुद्यावर दुगान्या झाडण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्राने किती ट्रेनची मागणी केली, किती दिल्या यावरून ट्विटर वार झाले. आता काँग्रेसच्या जेष्ठांनीही त्यावर भाजपा आणि प्रामुख्याने रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यावर जोरदार शरसंधान केल्याने राजकीय हवा तापली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी थेट पंतप्रधान नरेंद मोदी यांना उद्देशून एक ट्विट केले आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या कारभाराचा पंचनामा केला आहे. गेहलोत म्हणातात, “ जवळपास ४० श्रमिक ट्रेन उशिरा पोहचल्या, एका ट्रेनला तब्बल नऊ तास लागले आणि धक्कादाक प्रकार म्हणजे देशभरातील या रेल्वे प्रवासात ८० प्रवासी मृत झाले. रेल्वेच्या इतिहासात असे यापुर्वी कधी घडल्याचे एकिवात नाही. त्यामुळे आता रेल्वे मंत्री गोयल यांना सरळ बनिखात्याचे मंत्रीपद सोपवावे“.

कोरोनाच्या -४ च्या पंधरवड्यात परप्रांतीय कामगारांना आपापल्या गावाकडे जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली होती. रेल्वे उपलब्ध होत नसल्याने हजारो कामगार कुटुंबकबिल्यासह हजारो किलोमीटर पायी पायी निघाले. दरम्यान, रेल्वे बंद असल्याने रेल्वे मार्गावरून पाय जाणारे कामगार झोपले असता नाशिकजवळ मोठा अपघात झाला. मालगाडी ट्रेनने १४ कामागारांना चिरडले. देशभर त्या अपघाताची निर्भत्सना कऱण्यात आली. ९ ते २७ मे च्या दरम्यान ३,८४० श्रमिक विशेष ट्रेनमधून सुमारे ५० लाख प्रवाशांना सुखरूप पोचवले, असे रल्वेचा अहवाल सांगतो. बुधवारी अशा प्रवसा मृत झालेल्यांची संख्या नऊ असल्याचे सांगण्यात आले, पण रेल्वे मंत्री गोयल यांनी तत्काळ प्रकटन देत, ते मृत झालेले प्रवासी हे अगोदरच आजारी होते. बहुसंख्या मृत हे उपासमार आणि गरमी मुळे दगावले असेही सांगण्यात आले.

एकूणच या प्रकरणात अनेकांनी केंद्र सरकारला आरोपिच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. वारंवार मागणी करूनही केंद्राकडून रेल्वे उपलब्ध होत नसल्याचे शिवसेनी खासदार संजय राऊत यांनी म्हटले आणि थिणगी पडली. रेल्वेचा मार्ग एक असतो आणि जाते दुसरीकडेच अशी खोचक टीकाही राऊत यांनी केली होती. त्यावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आम्हाला प्रवाशांची यादीच मिळाली नाही अन्यथा मागणी प्रमाणे रेल्वे देण्याची तयारी असल्याचे सांगत शिवसेनेला उघडे पाडले. महाराष्ट्रात याच मुद्यावरून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारने केंद्राला दोष देत रेल्वेमंत्री गोयल यांचीच कुंडली मांडायला सुरूवात केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही गोयल यांनी पदाची प्रतिष्ठा राखावी असे म्हणत गोयल यांना लक्ष्य केले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राने उत्तर भारतीयांना वाईट वागणूक दिल्याचे सांगत या आगीत तेल ओतले. मुंबईतून आलेल्या प्रवाशांमुळे उत्तरप्रदेशमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याचा आरोप त्यांनी केला.

या श्रमिक रेल्वेमध्ये लोकांना ना पाणी ना अन्न मिळाले. अनेकांची उपासमार झाली. जेष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांचे अतोनात हाल झाले. कडाक्याच्या उन्हात घामाघुम झालेल्या या कामगारांना कायमचा आटवणीत राहील असा हा प्रवास झाला. बिहार ते उत्तरप्रदेश दरम्यान कामगारांना सोडून परतलेल्या एका ट्रेनच्या स्वच्छतागृहात आजारी व्यक्तीचा मृतदेह तसाच पडून होता तरी कोणाचेही लक्ष गेले नाही. अशा एक एक बातम्या आता बाहेर येत आहेत.

श्रमिक रेल्वेने गावाला जाणाऱ्या प्रवाशांना निरोप देण्याचे फोटो सर्वत्र छापून आले. या प्रवासाचा खर्च केंद्राने की राज्याने करायचा त्याचेही राजकारण तापले. महाराष्ट्राने या सर्व प्रवाशांसाठी कीत कोटी खर्च केले ते पत्रकार परिषद घेऊन आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी जाहीर केले. हा खर्च केंद्रानेच केल्याचा दावा भाजपाने केला. अशा प्रकारे श्रमिक रेल्वेचा वाद आठवडाभर पेटता राहीला. आज राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी थेट पंतप्रधान नरेंद मोदी यांना उद्देशून तिखट भाषेत ट्विट केल्याने हा वाद पुन्हा सुरू झाला आहे. एका श्रमिक ट्रेनला इच्छुक स्थळी पोचायला तब्बल नऊ तास लागल्याचे आणि आजवर अशा प्रवासात ८० लोकांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिल्याने आता भाजपा काय प्रत्युउत्तर देणार याची प्रतिक्षा आहे.